महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'काबिल'च्या प्रमोशनसाठी चीनला जाणार हृतिक रोशन - yami gautam

या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी हृतिक चीनच्या दौऱ्यावर जाणार असून याठिकाणी तो आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करणार आहे. चीनमध्ये हृतिकचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे, प्रीमियरदरम्यान हृतिक आपल्या चाहत्यांशी संवादही साधणार आहे.

'काबिल'च्या प्रमोशनसाठी चीनला जाणार हृतिक रोशन

By

Published : May 26, 2019, 3:22 PM IST

मुंबई- हृतिकच्या २०१७ मध्ये आलेल्या 'काबिल' या ड्रामा थ्रिलर चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता हा चित्रपट चीनमधील प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट ५ जूनला चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर २ जूनला याचं खास प्रीमियर आयोजित केलं गेलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी हृतिक चीनच्या दौऱ्यावर जाणार असून याठिकाणी तो आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करणार आहे. चीनमध्ये हृतिकचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे, प्रीमियरदरम्यान हृतिक आपल्या चाहत्यांशी संवादही साधणार आहे. ३० मे रोजी तो चीनकडे जाण्यासाठी रवाना होणार आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने हृतिक आणि यामीने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली. भारतात या चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शनसोबतच चित्रपट विश्लेषकांकडूनही कौतुकाची थाप मिळवली. आता हा चित्रपट चीनमधील प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्वी ठरतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details