मुंबई- हृतिकच्या २०१७ मध्ये आलेल्या 'काबिल' या ड्रामा थ्रिलर चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. भारतात या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर ५ जूनला हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित करण्यात आला. चीनमधील हृतिकचे चाहते या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद देतील, असा अंदाज वर्तवला जात होता.
हृतिकच्या 'काबिल'कडे चिनी प्रेक्षकांची पाठ; ३ दिवसात केवळ इतकी कमाई - yami gautam
चीनमधील हृतिकचे चाहते या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद देतील, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, चित्रपटाची आतापर्यंतची कमाई पाहता हा अंदाज चुकीचा ठरला असल्याचं म्हटलं जात आहे.
मात्र, चित्रपटाची आतापर्यंतची कमाई पाहता हा अंदाज चुकीचा ठरला असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटानं चीनमध्ये तीन दिवसांत केवळ १३.८७ कोटींची कमाई केली आहे. कमाईचे हे आकडे पाहता चित्रपट व्यापार विश्लेषकांनीही याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने हृतिक आणि यामीने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली. भारतात या चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शनसोबतच चित्रपट विश्लेषकांकडूनही कौतुकाची थाप मिळवली. मात्र, हा चित्रपट चीनमधील प्रेक्षकांची मने जिंकण्यास अपयशी ठरला आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.