मुंबई - आपल्या जादूई आवाजाने तरुणांच्या मनावर राज्य करणारा प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून झुबिन डेटींगमुळे चर्चेत आहे. झुबिन अनेकदा अभिनेत्री निकिता दत्तासोबत स्पॉट झाला आहे. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या बातम्या येत आहेत. कथित जोडपे रात्रीच्या जेवण आणि दुपारच्या जेवणात वारंवार स्पॉट होताना दिसत आहे. दोघेही विमानतळावर एकत्र स्पॉट झाले होते.
मीडियानुसार, झुबिन आणि निकिताचे कुटुंब पुन्हा एकत्र आले आहे. निकिता तिच्या कुटुंबासह उत्तराखंडमध्ये गायक झुबिनच्या घरी गेली होती आणि त्यानंतर झुबिनने मुंबईतील निकिताच्या कुटुंबीयांशी लग्नाबद्दल संपर्क केल्याची चर्चा आहे.