मुंबई - सध्या इंटरनेटवर बरंच चर्चेत असणार नाव म्हणजेच राणू मंडल. रेल्वे स्टेशनवर गाणं म्हणून दिवस पुढे सारणाऱ्या राणू यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल, की एक दिवस त्या चित्रपटसृष्टीचा एक भाग बनतील. आपल्या मधुर आवाजानं रेल्वे प्रवाशांचे मनोरंजन करणाऱ्या राणूंच्या गाण्यानं आज अवघ्या देशाचं मनं जिंकलं आहे.
रेल्वे स्टेशन ते चित्रपटसृष्टी, तिचा थक्क करणारा प्रवास - राणू मंडल
हिमेश रेशमियाच्या 'हॅपी हार्डी अॅण्ड हीर' सिनेमातील 'तेरी मेरी कहानी' या गाण्याला राणू यांनी आवाज दिला आहे. नुकतंच मुंबईत पार पडलेल्या एका इव्हेंटमध्ये हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आणि अवघ्या काही तासातच ते इंटरनेटवर ट्रेंड होऊ लागलं.
![रेल्वे स्टेशन ते चित्रपटसृष्टी, तिचा थक्क करणारा प्रवास](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4413624-thumbnail-3x2-ranu.jpg)
तिचा थक्क करणारा प्रवास
हिमेश रेशमियाच्या 'हॅपी हार्डी अॅण्ड हीर' सिनेमातील 'तेरी मेरी कहानी' या गाण्याला राणू यांनी आवाज दिला आहे. नुकतंच मुंबईत पार पडलेल्या एका इव्हेंटमध्ये हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आणि अवघ्या काही तासातच ते इंटरनेटवर ट्रेंड होऊ लागलं. रातोरात स्टार झालेल्या राणूंचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
तिचा थक्क करणारा प्रवास