मुंबई - अमेझॉन प्राइम व्हिडीओवरील आगामी 'छलांग' या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण केले आहे. या चित्रपटाची कथा शाळेतील क्रीडा शिक्षकाची असल्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात अनुभवलेले प्रसंग चित्रपट पाहताना डोळ्यासमोर उभे राहणार आहेत.
दिग्दर्शक हंसल मेहता या चित्रपटाच्या संकल्पनेविषयी म्हणाले, "छलांग हा माझ्या चित्रपटाच्या प्रवासाचा एक अतिशय रोमांचक भाग आहे. कारण माझ्यासाठी चित्रपट निर्मितीचे हे २०वे वर्ष आहे आणि जेव्हा आम्ही असा चित्रपट बनवत आहोत तर माझ्या २०व्या वर्षापेक्षा अधिक चांगली वेळ दुसरी कुठली असणार आहे? लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी दिवाळीहून जास्त चांगला काळ असूच शकत नाही.''
ते म्हणाले, "हा एक भक्कम संदेश असलेला चित्रपट आहे, जो करमणुकीच्या माध्यमातून स्वीकारणे सोपे आहे. सुंदर अभिनेत्री नुसरत आणि माझा आवडता राजकुमार राव यांच्यासहीत उत्तम स्टारकास्ट यात आहे. याची कथा लव रंजनने लिहिली आहे.''