मुंबई - जॉन अब्राहम आणि आदिती राव हैदरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रसिध्द झाला आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि रकुल प्रित सिंह यांच्याही भूमिका आहेत.
या नव्या लूकमध्ये आदिती राव हैदरी कुर्ता आणि शरारामध्ये दिसत असून जॉन अब्राहम दाढी आणि पगडीत दिसत आहे.
इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करीत आदितीने लिहिलंय, "एका नव्या सुरवातीच्या दिशेने."