महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

जॉन अब्राहमचे इंस्टाग्राम अकाउंट झाले ‘हॅक’, फॅन्स अस्वस्थ! - जॉनचे इंस्टाग्रामवर 9.7 दशलक्ष फॉलोअर्स

सायबर चोरांनी जॉन अब्राहमचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक केले आहे. जॉनचे इंस्टाग्रामवर 9.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे, हे अचानक सरप्राईज जॉन अब्राहमने त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा करण्याच्या काही दिवस आधी मिळाले आहे. 17 डिसेंबरला त्याचा वाढदिवस आहे.

जॉन अब्राहमचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक
जॉन अब्राहमचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक

By

Published : Dec 14, 2021, 7:30 PM IST

सोशल मीडिया सर्वांसाठी उपकारी साधन आहे, अगदी सायबर चोरांसाठीसुद्धा. जवळपास संपूर्ण जग सध्या सोशल मीडियावर अवलंबित झाल्यामुळे तिथेही चोरांची नजर गेली असून हे ‘हॅकर्स’ अनेकांचे समाज माध्यमांवरील अकाउंट्स हॅक करतात. ज्यांचे अकाउंट हॅक होते त्यांना मनस्ताप नक्कीच होतो जो नुकताच अभिनेता जॉन अब्राहामला झाला. सायबर चोरांनी जॉन अब्राहमचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक केले आहे. विशेष म्हणजे, हे अचानक सरप्राईज जॉन अब्राहमने त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा करण्याच्या काही दिवस आधी मिळाले आहे. 17 डिसेंबरला त्याचा वाढदिवस आहे.

जॉन अब्राहमचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक

कोणत्याही सोशल मीडिया जाणकार व्यक्तीची सर्वात मोठी भीती म्हणजे त्यांच्या सोशल अकाउंटशी झालेली तडजोड. बॉलीवूड सेलिब्रिटी आणि सार्वजनिक व्यक्तींना अनेकदा हॅकर्सद्वारे लक्ष्य केले जाते आणि त्यांच्या इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक खात्यांना लक्ष्य करून सायबर चोर बऱ्याचदा फसवणुकी करीत असतात आणि त्याला सामान्यजन बळी पडत असतात. अलीकडे, बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम सायबर क्राइमला बळी पडलेला नवीनतम सेलिब्रिटी असल्याचे दिसून येतेय.

जॉनचे इंस्टाग्रामवर 9.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. ते सर्व व्यथित आणि निराश झाले आहेत कारण हॅकरने जॉनच्या सर्व पोस्ट्स हटवल्यासारखे दिसत आहे. सर्वांना आशा आहे की जॉन अब्राहामचे इंस्टाग्राम अकाउंट लवकरच पुन्हा कार्यान्वित होईल.

हेही वाचा - inside story of Madipa's revenge : '83' विश्वचषकात कपिल देव आणि मदनलालने असा घेतला रिचर्ड्सचा बदला

ABOUT THE AUTHOR

...view details