मुंबई- दिल्लीच्या बाटला हाऊस चकमकीवर आधारित जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' आणि भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' हे चित्रपट स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित झाले. हे दोन्ही अभिनेते एकमेकांचे उत्तम मित्र असून बॉक्स ऑफ्स क्लॅशचा त्यांच्या मैत्रीवर काहीही परिणाम झाला नसल्याचे जॉननं शेअर केलेल्या एका गोष्टीतून समजते.
'देसी बॉईज' पुन्हा येणार एकत्र? जॉनने दिले संकेत - बॉक्स ऑफिस
नुकतंच जॉननं एका माध्यमाला मुलाखत दिली. यात तो म्हणाला, मिशन मंगलच्या यशावर शुभेच्छा देण्यासाठी मी जेव्हा अक्षयला मेसेज केला तेव्हा त्याने दिलेल्या रिप्लायनं माझं मनं जिंकलं.
नुकतंच जॉननं एका माध्यमाला मुलाखत दिली. यात तो म्हणाला, मिशन मंगलच्या यशावर शुभेच्छा देण्यासाठी मी जेव्हा अक्षयला मेसेज केला तेव्हा त्याने दिलेल्या रिप्लायनं माझं मनं जिंकलं. अक्षय म्हणाला, तुझ्या यशामुळे मला खूप आनंद झाला आहे. आता आपण एकत्र काम करण्याची वेळ झाली.
अक्षयच्या या मेसेजचा अर्थ देसी बॉईजनंतर हे कलाकार पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करण्यासाठी आतुर आहेत. प्रतीक्षा आहे ती उत्तम स्क्रीप्टची. दरम्यान अक्षयच्या मिशन मंगलनं आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ९७ कोटींची कमाई केली आहे. तर बाटला हाऊसनं ५१ कोटींचा गल्ला जमावला आहे.