महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'बाटला हाऊस'च्या यशावर जॉन अब्राहमची प्रतिक्रिया, म्हणाला.... - सामना

या चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादावर मी समाधानी आणि आनंदी आहे. हो, आमच्या या सिनेमाला प्रदर्शनाआधी अनेक अडथळ्यांचा आणि विरोधाचा सामना करावा लागला. पण तरीही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असं जॉन म्हणाला.

'बाटला हाऊस'च्या यशावर जॉन अब्राहमची प्रतिक्रिया

By

Published : Aug 17, 2019, 4:38 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला देशभरातून मिळत असलेल्या प्रतिसादावर आता जॉननं प्रतिक्रिया दिली आहे. ही बाब आपल्यासाठी खरंच आनंददायी असल्याचं त्यानं म्हटलं आहे.

या चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादावर मी समाधानी आणि आनंदी आहे. हो, आमच्या या सिनेमाला प्रदर्शनाआधी अनेक अडथळ्यांचा आणि विरोधाचा सामना करावा लागला. पण तरीही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांच्या सोशल मीडियावर आणि इतर ठिकाणीही या सिनेमाला सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहे, याचा आनंद असल्याचं जॉननं म्हटलं.

या चित्रपटावर मिळालेली सर्वोत्तम प्रतिक्रिया ही होती, की हा सिनेमा 'साकी साकी' गाण्यापेक्षा आणि ट्रेलरपेक्षाही खूप चांगला आहे. आणि यासारख्या प्रतिक्रिया प्रोत्साहन देण्यासोबत आपल्या चांगल्या कामाबद्दलचं समाधानही देतात, असं तो पुढे म्हणला. दरम्यान, बाटला हाऊस हा सिनेमा दिल्लीच्या 'बाटला हाऊस' चकमकीची कथा मांडणारा आहे. स्वातंत्र्यदिनी हा चित्रपट प्रदर्शित झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details