मुंबई- 'देसी बॉईज' चित्रपटातील अक्षय आणि जॉनची जोडी आजही अनेकांच्या लक्षात असेल. चित्रपटाप्रमाणेच रिअल लाईफमध्येही उत्तम मित्र असलेल्या या कलाकारांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्याने दोघांमध्ये बॉक्स ऑफिसवर क्लॅश पाहायला मिळणार आहे.
अक्षयसोबतच्या क्लॅशवर जॉनची प्रतिक्रिया; म्हणाला, मेक सम नॉईज फॉर देसी बॉईज - Mission Mangal
अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' आणि जॉनचा 'बाटला हाऊस' हे दोन्ही चित्रपट स्वातंत्र्यदिनी म्हणजेच येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहेत. दोन्ही चित्रपटांचे विषय चांगले आहेत आणि प्रेक्षकांना निवड करण्याची संधी आहे, असे म्हणत जॉनने ही टक्कर केवळ बॉक्स ऑफिसवर असल्याचे म्हटले आहे.
![अक्षयसोबतच्या क्लॅशवर जॉनची प्रतिक्रिया; म्हणाला, मेक सम नॉईज फॉर देसी बॉईज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3800745--thumbnail-3x2-john.jpg)
अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' आणि जॉनचा 'बाटला हाऊस' हे दोन्ही चित्रपट स्वातंत्र्यदिनी म्हणजेच येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जॉनला याबद्दल प्रश्न विचारला असता दोन चित्रपटांची टक्कर किंवा विवाद मला नेहमीच आवडतात. मात्र, अक्षय आणि मी खूप चांगले मित्र आहोत, असे जॉनने म्हटले आहे.
सोमवारीच आम्हा दोघांचं एकमेकांशी मेसेजवर बोलणंही झालं. आम्हाला याबद्दल काहीही हरकत नाही. दोन्ही चित्रपटांचे विषय चांगले आहेत आणि प्रेक्षकांना निवड करण्याची संधी आहे, असे म्हणत जॉनने ही टक्कर केवळ बॉक्स ऑफिसवर असल्याचे म्हटले आहे. दरम्यान याच दिवशी श्रद्धा आणि प्रभासचा 'साहो' चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे, प्रेक्षक आता कोणत्या चित्रपटाला पसंती दर्शवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.