महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'सत्यमेव जयते 2'चे शूटिंग जॉन अब्राहम करणार सुरू - जॉन अब्राहम लेटेस्ट न्यूज

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम बुधवारपासून लखनऊमध्ये आपल्या आगामी ‘सत्यमेव जयते 2’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. मुंबईतील कोविड-19च्या संकटामुळे इतर शहरांना हिंदी चित्रपटांचे शूटिंग 'होस्ट' करण्याची संधी मिळाली आहे. या चित्रपटात जॉन अब्राहमसह मनोज वाजपेयी आणि दिव्या खोसला कुमारदेखील मुख्य भूमिकेत आहेत. 2018 च्या अ‍ॅक्शन ड्रामा 'सत्यमेव जयते' चा हा सिक्वेल आहे.

सत्यमेव जयते 2
सत्यमेव जयते 2

By

Published : Oct 21, 2020, 2:34 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम बुधवारपासून लखनऊमध्ये आपल्या आगामी ‘सत्यमेव जयते 2’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. मुंबईतील कोविड-19च्या संकटामुळे इतर शहरांना हिंदी चित्रपटांचे शूटिंग 'होस्ट' करण्याची संधी मिळाली आहे. आता लखनऊमध्ये जॉनसह दिव्या खोसला कुमार या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तयार आहे.

मिलाप झवेरी दिग्दर्शित या चित्रपटात जॉन अब्राहमसह मनोज वाजपेयी आणि दिव्या खोसला कुमारदेखील मुख्य भूमिकेत आहेत. 2018च्या अ‍ॅक्शन ड्रामा 'सत्यमेव जयते' चा हा सिक्वेल आहे. भूषण कुमार या चित्रपटाचे निर्माता आहेत.

हेही वाचा -दि व्हाईट टायगर : प्रियांका चोप्रा आणि राजकुमार राव यांचा 'फर्स्ट लुक' रिलीज

'पहिल्या दिवशी आम्ही फक्त मुख्य जोडीबरोबर काम करू आणि हळूहळू हर्ष छाया, गौतमी कपूर, शाद रंधावा, अनूप सोनी आणि साहिल वैद्य हे कलाकारही हळूहळू चित्रीकरणात सहभागी होतील. आम्ही या चित्रपटाचे चित्रीकरण लखनऊमध्ये करणार आहोत. यात जुन्या हवेली, महाविद्यालये आणि बरेच काही समाविष्ट असतील. कोरोनाचा धोका असतानाच हे चित्राकरण सुरू होत आहे. काही लाइव्ह लोकेशन्स यात वापरण्यात येणार असून येथे गर्दी जमा होऊ नये, म्हणून ती पूर्णपणे सील केली गेली आहेत. केवळ आमची टीमच घटनास्थळी हजर राहील,' असे झवेरी यांनी चित्रपटाच्या शूटिंगविषयी सांगितले.

भाग 2 हा 2018च्या चित्रपटापेक्षा मोठा आणि अधिक चांगला होईल, असे वचन निर्माता भूषण कुमार यांनी दिले आहे. 'जेव्हा आम्ही जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार यांना फ्रँचायझीमध्ये घेण्याचे ठरविले, तेव्हा आम्हाला 'लार्जर दॅन लाइफ' अशी कथा आणि पात्रांसह तयार राहावे लागले. या चित्रपटाच्या स्क्रिप्टला एक उंची आहे आणि लॉकडाऊनदरम्यान मिलापने जॉनबरोबरच्या अ‍ॅक्शन सीन्सवर कठोर मेहनत घेतली आहे,' असे ते म्हणाले.

हेही वाचा -विरुष्काने यूएईमध्ये घेतला जादुई सूर्यास्तातील समुद्रस्नानाचा आनंद

ABOUT THE AUTHOR

...view details