‘सत्यमेव जयते’ (Satyamev Jayate) च्या अभूतपूर्व यशानंतर जॉन अब्राहम (John Abraham) त्याचा सिक्वेल ‘सत्यमेव जयते २’ (Satyamev Jayate-2)घेऊन येत आहे. नुकतेच या बहुप्रतिक्षित ऍक्शन चित्रपटातील 'तेनू लेहेंगा' (Tenu lehenga) हे गाणे समाज माध्यमांवर प्रदर्शित केले गेले. लोकप्रिय पंजाबी म्युझिक सेन्सेशन जस मानक यांच्या 'लेहेंगा' या लोकप्रिय गाण्यावर हे गीत बनले असून यात जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार (Divya Khosla Kumar) तन्मयतेने नाचताना दिसत आहेत.
महत्वाचं म्हणजे दिव्या खोसला कुमारसोबत जॉन अब्राहमच्या दोन्ही व्यक्तिरेखा थिरकताना दिसताहेत. हे गाणे प्रेक्षकांना नाच करण्यासाठी उद्युक्त करणारे आहे हे नक्की. ‘लेहेंगा’ हे मूळ गाणे जस मानक यांनी लिहिले असून संगीतही त्यांनी दिले आहे दिले आणि गायले सुद्धा आहे. असे असले तरी संगीतकार तनिष्क बागची (Musician Tanishq Bagchi) यांनी ते नवीन पद्धतीने तयार केले असून आणि जस मानक आणि झारा खान यांनी ते गायले आहे.
या गाण्याबद्दल सांगताना जॉन अब्राहम म्हणाला, 'पार्टी आणि लग्नांमध्ये लेहंगाची क्रेझ असते. जस मानक हे संगीत क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहेत. मला त्याच्या आणि दिव्यासोबत इतक्या दिवसांनी डान्स करताना खूप मजा आली, तीही दुहेरी भूमिकेत. तो एक वेगळा अनुभव होता."