मुंबई - मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या झुंडच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या सविता राज हिरेमठ यांनी म्हटलंय की त्यांचा चित्रपट करमुक्त का करण्यात आला नाही, याचा मला त्रास झाला आहे, कारण या चित्रपटाला केवळ प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसादच मिळाला नाही तर एक आपल्या देशाच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण विषयही यात हाताळण्यात आला आहे.
'झुंड' चित्रपट 4 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, यात अमिताभ बच्चन यांनी नागपूरचे निवृत्त क्रीडा शिक्षक विजय बरसे यांची भूमिका साकारली आहे. बारसे यांनी 'स्लम सॉकर लीग'साठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला होता. या चित्रपटातून 'फॅन्ड्री' आणि 'सैराट' या गाजलेल्या मराठी चित्रपटांसाठी ओळखले जाणारे चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
'झुंड' रिलीज झाल्याच्या एका आठवड्यानंतर द काश्मीर फाइल्स हा चित्रपट रिलीज झाला. काश्मीरमधील खोऱ्यातून १९९० च्या दशकात काश्मीरी पंडितांना पलायन करावे लागले होते. त्यांची ह्रदयद्रावक कथा काश्मीर फाईलमध्ये मांडण्यात आली आहे. या चित्रपटाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) अनेक नेत्यांसह केंद्र सरकारकडून पाठिंबा मिळाला, ज्यांनी चित्रपटाला करमुक्तीसाठी मान्यता दिली.
अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'काश्मीर फाईल्स' चित्रपटाला उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, कर्नाटक, बिहार, त्रिपुरा आणि गोवा या राज्यांमध्येही करमुक्त घोषित करण्यात आले. शुक्रवारी हिरेमठ यांनी फेसबुकवर लिहिले की, ''द काश्मीर फाइल्स हा एक महत्त्वाचा चित्रपट असला तरी झुंड काही कमी नाही.''
"मी काश्मिरी पंडितांच्या निर्गमनाची हृदयद्रावक कथा असलेला द काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिला आणि ही कथा सांगण्याची गरज आहे. काश्मीरी पंडितांसाठी हा एक चांगला आवाज आहे! पण झुंडचा निर्माती म्हणून मी गोंधळून गेले आहे. शेवटी झुंड हा देखील एक महत्त्वाचा चित्रपट आहे आणि त्याची कथा आणि एक मोठा संदेश आहे ज्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रशंसा आणि कौतुक मिळाले आहेत," असे त्या म्हणाल्या.