मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभेतील खासदार जया बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. जया बच्चन करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचे शूटिंग करत होत्या. त्या कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर शूटिंग थांबवण्यात आले आहे. चित्रपटाचे पुढील शूटिंग दिल्लीत होणार होते.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातील आणखी एक अभिनेत्री शबाना आझमीही तीन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. जया बच्चन यांची शबाना यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचे शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.