महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'तख्त' चित्रपटात जावेद जाफरी साकारणार महत्वपूर्ण भूमिका - Javed Jaffrey role in takht film

करण जोहर तख्त चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच भव्य दिव्य चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. डिसेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Javed Jaffrey plays important role in Takht Film
'तख्त' चित्रपटात जावेद जाफरी साकारणार महत्वपूर्ण भूमिका

By

Published : Apr 9, 2020, 11:41 AM IST

मुंबई -दिग्दर्शक करण जोहरच्या तख्त चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट, विकी कौशल, भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर, करीना कपूर, अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्ट झळकणार आहे. अभिनेते जावेद जाफरी यांची देखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भूमिकेविषयी खुलासा केला.

करण जोहर तख्त चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच भव्य दिव्य चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. डिसेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

'तख्त' चित्रपटात जावेद जाफरी साकारणार महत्वपूर्ण भूमिका
जावेद जाफरी या चित्रपटात मुघल दरबारातील मुख्य काझीची भूमिका साकारणार आहेत. ही भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.या चित्रपटानंतर जावेद जाफरी हे सूर्यवंशी आणि कूली नंबर वन या चित्रपटात देखील भूमिका साकारताना दिसणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details