महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

एनसीबी कार्यालयात जावेद जाफरी, ''वैयक्तिक काम'' म्हणत बोलणे टाळले - Actor Javed Jaffrey at the Narcotics Control Bureau office

अभिनेता जावेद जाफरी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी)च्या कार्यलयाबाहेर दिसल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. एनसीबी कार्यालय सोडताना जावेद जाफरी यांने माध्यमांशी बोलणे टाळले आणि त्यांच्या गाडीत निघून गेला.

Javed Jaffrey
जावेद जाफरी

By

Published : Nov 6, 2020, 7:11 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूमध्ये ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) सक्रिय झाला. अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांनाही ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर, तपास जसजसा पुढे गेला तसतसे बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आले.

बॉलिवूड सिने उद्योगातील अनेक लोकांची एनसीबी टीमने चौकशी केली. त्याचवेळी या पथकाने अनेक ड्रग पेडलर्सना अटक केली. दरम्यान अभिनेता जावेद जाफरी एनसीबी कार्यालयात पोहोचला. मात्र तो तेथे का गेला हे माहिती नाही.

जावेद जाफरी गुरुवारी एनसीबी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी त्याला इथे का आला याबद्दल प्रश्न विचारायला सुरूवात केली. कोणाच्या विरुध्द तक्रार केली का असेही त्याला विचारण्यात आले. एनसीबी कार्यालय सोडताना जावेद जाफरी यांने माध्यमांशी बोलणे टाळले आणि त्यांच्या गाडीत निघून गेला. त्याने फक्त सांगितले की आपल्याकडे फक्त वैयक्तिक काम आहे आणि काही सल्ला मसलत करायला आलो होतो असे तो म्हणाला.

कामाच्या पातळीवर बोलायचे झाले तर जाफेद जाफरी हा आयुष्मान खुरानाच्या ‘बाला’ या चित्रपटात शेवटचा दिसला होता. या चित्रपटातील त्याने बच्चन दुबे हे पात्र रंगवले होते. सध्या तो 'कुली क्र. 1 ',' सूर्यवंशी 'आणि' 'भूत पोलिस' या चित्रपटातून भूमिका करीत आहे. दरम्यान त्याच्या 'भूत पोलिस ' या चित्रपटाचे शूटिंग आजपासून डलहौसीमध्ये सुरू झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details