महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Javed Akhtar on Hijab : ''हिजाब किंवा बुरख्याचे समर्थन नाही, परंतु गुंडांच्या जमावाबद्दल मनात तिरस्कार'' - जावेद अख्तर - कर्नाटक हिजाब प्रकरण

जावेद अख्तर ( Javed Akhtar ) यांनी सोशल मीडियावर कर्नाटकात हिजाब ( Hijab ) परिधान करण्यावरुन सुरू असलेल्या वादाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी लिहिलंय की ते हिजाबच्या बाजूने नाहीत परंतु मुलींच्या एका गटाला धमकावण्याचा प्रयत्न करणार्‍या गुंडांचा ते निषेध करतात.

गीतकार जावेद अख्तर
गीतकार जावेद अख्तर

By

Published : Feb 11, 2022, 4:51 PM IST

मुंबई (महाराष्ट्र ) - ज्येष्ठ पटकथा लेखक-गीतकार जावेद अख्तर ( Javed Akhtar ) यांनी गुरुवारी सांगितले की ते कधीही हिजाब किंवा बुरख्याचे समर्थक नव्हते, परंतु कर्नाटकातील सध्या सुरू असलेल्या समस्येवर हिजाब परिधान केलेल्या मुलींना "धमकावण्याचा" प्रयत्न करणाऱ्यांमुळे ते खूप संतापले आहेत. कर्नाटकातील काही भागांमध्ये हिजाबच्या बाजूने आणि विरोधात निदर्शने तीव्र झाली आहेत. दक्षिणेकडील राज्यातील सरकारने गेल्या आठवड्यात शाळा आणि प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी गणवेश अनिवार्य करण्याचा किंवा खाजगी संस्थांच्या व्यवस्थापनाला अनिवार्य करण्याचा आदेश जारी केल्यानंतर मंगळवारी काही ठिकाणी निदर्शने हिंसक झाली.

या वादामुळे मंगळवारी भाजप-शासित सरकारने शिक्षण संस्थांसाठी तीन दिवसांची सुट्टी जाहीर केली. जावेद अख्तर यांनी ट्विटरवर लिहिले की, मुलींच्या एका गटाला धमकावण्याचा प्रयत्न करणार्‍या "गुंडांचा" ते तिरस्कार करतात.

"मी हिजाब किंवा बुरख्याच्या बाजूने कधीच नव्हतो. मी आजही त्यावर ठाम आहे पण त्याचवेळी मुलींच्या एका छोट्या गटाला धमकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या या गुंडांच्या जमावांबद्दल माझ्या मनात तीव्र तिरस्काराशिवाय काहीही नाही. 'मर्दपणा'ची कल्पना अशी असते का. किती खेदाची गोष्ट आहे," असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

जेव्हा एका ट्विटर युजरने जावेद अख्तर यांना हिजाब किंवा बुरखा परिधान केलेल्या महिलांच्या मुद्द्यावर मौन बाळगल्याबद्दल प्रश्न केला तेव्हा ज्येष्ठ पटकथाकार जावेद अख्तर यांनी लिहिले की, ज्यांच्या खांद्यावर भगवी शाल आहे त्यांना मला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. जावेद अख्तर लिहितात, "माझ्यासारख्या धर्मनिरपेक्ष लोकांना बुरखा आणि हिजाबला विरोध करण्याचा अधिकार आहे (आम्ही ते नेहमीच केले आहे) परंतु ज्यांच्या खांद्यावर भगवी शाल आहे त्यांना नाही. ते त्याच विचारसरणीचे नाहीत का ज्यांच्यामुळे मंगलोरमधील रेस्टॉरंटमध्ये कॉफी घेत असलेल्या हिंदू मुलींवर अत्याचार झाला."

गुरुवारी, कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाबच्या मुद्द्यावर सुनावणी करताना विद्यार्थ्यांना या प्रकरणाचे निराकरण होईपर्यंत शैक्षणिक संस्थांच्या कॅम्पसमध्ये कोणतेही कपडे घालण्याचा आग्रह करू नका, असे सांगितले. सोमवारपर्यंत सुनावणी पुढे ढकलत न्यायालयाने असेही सांगितले की शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांसाठी वर्ग पुन्हा सुरू करू शकतात.

अभिनेत्री स्वरा भास्कर, रिचा चढ्ढा, चित्रपट निर्माते नीरज घायवान आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासह इंडस्ट्रीतील इतर अनेकांनीही या वादाविरोधात आवाज उठवला आहे.

हेही वाचा - Hijab And Burqa In Bollywood :दीपिका पदुकोण ते आलिया भट्टपर्यंत चित्रपटात 'बुरखा' परिधान करणाऱ्या अभिनेत्री!!

ABOUT THE AUTHOR

...view details