मुंबई- काही दिवसांपूर्वी केलेल्या राष्ट्रविरोधी विधानामुळे शबाना आझमी चांगल्याच ट्रोल झाल्या आहेत. शबाना यांनी देशात घडणा-या घटनांवर भाष्य केले होते. देशाच्या कामकाजात त्रुटी आढळून येत असतील, तर त्यावर खुलेपणाने चर्चा करणे हे तितकेच महत्वाचे आहे, कारण ते देशहितासाठी आहे. पण आज सरकारविरोधात बोलणा-याला थेट देशद्रोही ठरवले जाते, असे त्या म्हणाल्या होत्या.
गद्दाराची औलाद तुझी औकात काय? शबाना आझमींना ट्रोल केल्यानं जावेद अख्तर भडकले
आज सरकारविरोधात बोलणा-याला थेट देशद्रोही ठरवले जाते,या विधानामुळे शबाना आझमींवर चांगलीच टीका होत आहे. जेव्हा यांचे नातेवाईक असलेले दहशतवादी मारले जातात तेव्हा यांना दुःख होतं. मग भारत सोडत का नाही? असा सवाल एका यूजरने केला आहे.
त्यांच्या या विधानामुळे सध्या त्यांच्यावर चांगलीच टीका होत आहे. एका यूजरने ट्विट करत म्हटले की, काश्मीरमध्ये चकमक झाली तर त्याचं यांना वाईट वाटतं नाही. बंगालमध्ये हत्या होते त्याचं यांना काहीच दुःख नाही. दिल्लीत मंदिर तोडलं जातं, यांना वाईट नाही वाटत. मात्र, जेव्हा यांचे नातेवाईक असलेले दहशतवादी मारले जातात तेव्हा यांना दुःख होतं. मग भारत सोडत का नाही? असा सवाल केला आहे.
या ट्विटवर शबाना आझमींना पाठिंबा देत जावेद अख्तरने सडेतोड उत्तर दिले आहे. जेव्हा आमचे पूर्वज स्वातंत्र्यासाठी रक्त सांडत होते, तेव्हा तुझ्यासारख्यांचे पुर्वज इंग्रजांचे पाय चाटत होते. गद्दाराची औलाद तुझी काय औकत आहे, की तू आम्हाला आमचा देश सोडायला सांगतोय, असे ट्विट जावेद अख्तर यांनी केले आहे.