मुंबई -बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच चर्चेत असते. कधी तिचा लुक, कधी तिची ड्रेसिंग स्टाईल तर, कधी तिचे चित्रपट या सर्वच गोष्टींची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळते. आता पुन्हा एकदा ती एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. कदाचित यापूर्वी जान्हवीने हे गुपित कोणालाही सांगितले नसावे.
अलार्म नाही, तर या गोष्टीमुळे जान्हवीला उठवता येणं सोप्पं सध्या जान्हवीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवीला झोपेतून उठवण्याचे गुपित दडलेले आहे. अलीकडेच ती तिची बहीण खूशी कपूरला भेटण्यासाठी न्यूयॉर्क येथे गेली होती. तिथे ती गाढ झोपेत असताना तिची मैत्रीण तिला एका हटके पद्धतीने उठवताना दिसते.
हेही वाचा -सूरज पांचोली बनणार 'बॉक्सर', पहिली झलक प्रदर्शित
होय, जान्हवीला उठवण्यासाठी अलार्म नाही, तर आईस्क्रीम पुरेसे आहे. तिला आईस्क्रीम एवढं आवडतं, की त्यासाठी ती झोपेतूनही उठू शकते. तिच्या मैत्रीणीने तिचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. 'काही लोकांना अलार्म नाही तर आईस्क्रीमनेही उठवता येतं', असं कॅप्शन तिने या व्हिडिओवर दिले आहे. जान्हवीनेही तिच्या इन्स्टास्टोरीमध्ये हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, जान्हवीकडे सध्या बरेच प्रोजेक्ट आहेत. ती कारगिल गर्ल गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. तसेच, 'दोस्ताना २', 'रुही अफ्जा', 'तख्त' आणि 'मिस्टर लेले' यांसारख्या चित्रपटात देखील तिची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा -'आशिकी' चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण, कपिल शर्मासोबत उलगडणार आठवणी