मुंबई- करण जोहरच्या धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या पहिल्या चित्रपटापासूनच चर्चेत राहिली. जान्हवी लवकरच कारगिल गर्ल चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या काही शेड्यूलचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर आता जान्हवीने हार्दिक मेहतांच्या 'रूही अफ्जा' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.
हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट असणार असून यात जान्हवीसोबतच राजकुमार रावही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असून आता या चित्रटाच्या सेटवरील जान्हवी कपूरचा फोटो समोर आला आहे.