मुंबई - अभिनेत्री जान्हवी कपूरनं एका वर्षापूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिच्या पदार्पणीय 'धडक' चित्रपटाच्या प्रदर्शनाला आज एक वर्ष झालं. यानिमित्तानं एक खास पोस्ट आणि चित्रपटाच्या टीमसोबतचे काही फोटो जान्हवीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
एका कुटुंबाला, तुमच्या प्रेमाला अन् खूप साऱ्या आठवणींना १ वर्ष, जान्हवी झाली भावूक - karan johar
धन्यवाद करण जोहर, या चित्रपटासोबतच तू मला एक कुटुंब दिलं, मला संधी दिली आणि ज्या रस्त्यावर जाण्याचं माझं स्वप्न होतं, त्यासाठी मार्ग दिला. वेळोवेळी मला सहकार्य करण्यासाठी धन्यवाद, असं जान्हवीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
एका कुटुंबाला, तुमच्या प्रेमाला, मधू आणि पार्थ्वीला आणि खूप साऱ्या आठवणींना एक वर्ष पूर्ण. या प्रवासात असे लोक भेटले जे आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. धन्यवाद करण जोहर, या चित्रपटासोबतच तू मला एक कुटुंब दिलं, मला संधी दिली आणि ज्या रस्त्यावर जाण्याचं माझं स्वप्न होतं, त्यासाठी मार्ग दिला. वेळोवेळी मला सहकार्य करण्यासाठी धन्यवाद, असं जान्हवीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तर यासाठी दिग्दर्शक शशांक खेतानचेही तिने आभार मानले आहेत. तू शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आभारी आहे. आमच्यासोबत प्रत्येक परिस्थितीत उभा राहण्यासाठी आणि आमच्या अपेक्षापेक्षाही जास्त प्रेम देण्यासाठी धन्यवाद, असं तिनं म्हटलं आहे. तर ईशान खट्टरचंही तिनं कौतुक केलं आहे. तुझ्याबद्दल जितकं बोलेलं ते कमीच आहे. तुझ्यासोबत माझ्या पहिल्या चित्रपटाचा प्रवास करून खूप आनंद झाला, असं म्हणत धडकच्या संपूर्ण टीमची रोजच खूप आठवण येते, असं जान्हवीनं म्हटलं आहे.