मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि मौनी रॉय यांनी शेअर केलेल्या अलिकडील फोटोमुळे चाहते दंग झाले आहेत. जान्हावीने एका मॅगझीन फोटोशूटसाठी केलेला जुना व्हिडिओ शेअर केलाय तर मौनीच्या लेटेस्ट फोटोमध्ये तिचे साडी प्रेम दिसून येते.
मंगळवारी, जान्हवीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ती सिक्विन बिकिनी टॉप आणि स्लिट स्कर्ट घातलेली दिसत आहे. पोशाखानुसार, व्हिडिओ जान्हवीने ट्रॅव्हल आणि लेझर मॅगझिनसाठी फोटोशूट केल्याचा दिसत आहे. हे फोटोशूट तिने या वर्षी मे महिन्यात केले होते. जान्हवीने मालदीवमध्ये मॅगझिनसाठी शुटिंग केले. पोस्टला दिलेल्या शीर्षकावरुन लक्षात येते की ती अद्यापही सुट्टीच्याच गोष्टींमध्ये रमली आहे.
आणखी एक अभिनेत्री जिने सिक्विन आउटफिटची निवड केली आहे ती आहे मौनी रॉय. जान्हवीच्या उलट तिला लुक पारंपारिक आहे. तिने सुंदर साडी नेसली असून याला तिने मस्त कॅप्शन दिलंय.