महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

विमानतळावर केक कापून जान्हवी कपूरचे सुरू झाले बर्थडे सेलेब्रिशन - जान्हवी कपूरचा डाय हार्ड फॅन

जान्हवी कपूर 6 मार्चला तिचा 25 वा वाढदिवस साजरा करणार आहे. जान्हवी कपूर काल रात्री मुंबई विमानतळावर दिसली आणि अभिनेत्रीचा डाय हार्ड फॅन केक घेऊन तिथे पोहोचला.

जान्हवी कपूरचे बर्थडे सेलेब्रिशन
जान्हवी कपूरचे बर्थडे सेलेब्रिशन

By

Published : Mar 5, 2022, 12:53 PM IST

मुंबई - 'धडक' अभिनेत्री जान्हवी कपूरची फॅन फॉलोइंगही काही कमी नाही. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची लाईन खूप मोठी आहे. अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर 15 दशलक्षाहून अधिक चाहते आहेत, जे तिला रात्रंदिवस फॉलो करतात. जान्हवी देखील तिच्या चाहत्यांमध्ये जास्त अंतर ठेवत नाही आणि प्रत्येक दिवस ती सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांच्या मनावर राज्य करत असते.

जान्हवी 6 मार्चला तिचा 25 वा वाढदिवस साजरा करणार आहे. जान्हवी कपूर काल रात्री मुंबई विमानतळावर दिसली आणि अभिनेत्रीचा डाय हार्ड फॅन (पापाराझी) केक घेऊन तिथे पोहोचला.

जान्हवी कपूरनेही या चाहत्याचे मन मोडले नाही आणि विमानतळावरच हसत हसत फॅनसोबत केक कापला. यादरम्यान जान्हवी कपूर ब्राऊन कपड्यांमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

जान्हवी कपूर सोशल मीडियावर सक्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवी दररोज तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे बोल्ड फोटोशूट शेअर करत असते. जान्हवी कधी बोल्ड तर कधी एथनिक लूकमध्ये तिच्या फोटोशूटचे फोटो इंस्टा वॉलवर सजवत असते.

जान्हवी कपूरचे बर्थडे सेलेब्रिशन

जान्हवी कपूरच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती 'दोस्ताना-2' आणि 'गुड लक जेरी' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. जान्हवी शेवटची 'रुही' (2021) चित्रपटात दिसली होती.

हेही वाचा -शाहरुख, दीपिका 'पठाण' शूटसाठी स्पेनला रवाना पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details