महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 12, 2019, 8:04 PM IST

ETV Bharat / sitara

'कारगिल गर्ल'च्या चित्रीकरणासाठी जॉर्जियाला रवाना होणार जान्हवी अन् अंगद बेदी

भारतीय वायु दलाची पहिली महिला वैमानिक गुंजन सक्सेनावर हा चित्रपट आधारित असेल. गुंजन या १९९९ च्या युद्धादरम्यान कारगिलमध्ये तैनात होत्या. कारगिल युद्धातील त्यांच्या योगदानावर आधारित या चित्रपटात जान्हवी गुंजन यांची भूमिका साकारणार आहे.

जॉर्जियाला रवाना होणार जान्हवी अन् अंगद बेदी

मुंबई- धडक या पदार्पणीय चित्रपटाला मिळालेल्या तुफान यशानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतीय वायु दलाची पहिली महिला वैमानिक गुंजन सक्सेनावर हा चित्रपट आधारित असेल. गुंजन या १९९९ च्या युद्धादरम्यान कारगिलमध्ये तैनात होत्या. कारगिल युद्धातील त्यांच्या योगदानावर आधारित या चित्रपटात जान्हवी गुंजन यांची भूमिका साकारणार आहे.

कारगिल गर्ल असं शीर्षक असलेल्या या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचं चित्रीकरण मुंबईमध्ये झालं. मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलचं चित्रीकरण जॉर्जियामध्ये होणार असून जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जान्हवी आणि अंगद बेदी चित्रीकरणासाठी जॉर्जियाला रवाना होणार आहे.

समुद्र सपाटीपासून ५ हजार ७०० फूट उंचीवर असलेल्या जॉर्जियातील कझबेगी शहरात हे चित्रीकरण केलं जाणार आहे. यासाठी अंगद सध्या प्रशिक्षण घेत आहे. या चित्रपटात अंगद बेदी आणि जान्हवी कपूरशिवाय पंकज त्रिपाठीदेखील महत्तवाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा करणार आहेत आणि या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details