मुंबई - दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरचा एक व्हिडिओ सध्या बराच चर्चेत आहे. यात तिच्यातील वेगळेपण दिसून येते. मुंबईच्या रसत्यावरुन जाताना एक मुलगी तिला भेटली. ती जान्हवीकडे खायाला मागत होती. त्या मुलीला ती कशी व्यक्त झाली हे या व्हिडिओत दिसून येते.
रस्त्यावरच्या मुलीशी जान्हवी असे काही वागली... की व्हिडिओ झाला व्हायरल - Janhavi Kapoor give food to hungry little girl
रस्त्यावर चालताना भुकेल्या मुलीला जान्हवी कपूरने खाऊ दिला. पण ही गोष्ट प्रसिध्द होऊ नये याची दक्षता घ्यायला ती विसरली नाही.
![रस्त्यावरच्या मुलीशी जान्हवी असे काही वागली... की व्हिडिओ झाला व्हायरल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5014130-thumbnail-3x2-oo.jpg)
त्या भूकेल्या मुलीला जान्हवीने आपल्या बरोबर यायला सांगितले. जान्हवी एका मुलीसोबत चालते म्हटल्यावर बघ्यांचे कॅमेरे तिला टिपत होते. ती चालत गाडीजवळ पोहोचली. तिला शूट करणाऱ्या फोटोग्राफर्सना तिने कॅमेरे बंद करण्याची विनंती केली. कॅमेरे बंद होताच तिने गाडीचा दरवाजा उघडला आणि गाडीतील खाऊ त्या भुकेल्या मुलीला देऊ केला.
खरंतर हे ती कॅमेरा चालू असतानाही करु शकली असती. मात्र आपण करीत असलेली मदत दिखाऊपणाची होऊ नये याची जान्हवीने पूर्ण काळजी घेतली. तिच्या या कृतीचा सगळ्यांनाच हेवा वाटला. त्या मुलीला खाऊ मिळल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता.