मुंबई- अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला अंमलबजावणी संचालनालयाने 200 कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणात साक्षीदार म्हणून तिचे जवाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे. तिच्या प्रवक्त्याने शनिवारी ही माहिती दिली. फेडरल एजन्सीसमोर अभिनेत्री हजर झाल्यानंतर दोन दिवसांनी हे विधान केले आहे. त्याआधी, ईडीकडून समन्स देऊनही ती किमान तीन प्रसंगी हजर राहिली नव्हती.
फर्नांडिसच्या प्रवक्त्याने सांगितले की ती तपासात एजन्सीला पूर्ण सहकार्य करेल. प्रवक्त्याने एक निवेदन जारी केले, 'ईडी जॅकलिन फर्नांडिसला साक्षीदार म्हणून तिचे जवाब नोंदवण्यासाठी बोलावते आहे. तिने तिचे म्हणणे नोंदवले आहे आणि भविष्यातील तपासातही एजन्सीला पूर्ण सहकार्य करेल.
प्रवक्त्याने पुढे सांगितले, 'जॅकलिनने त्यात सहभागी असलेल्या जोडप्याशी असलेल्या संबंधांबद्दल केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्यांना वारंवार नकारही दिला आहे.' मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार बुधवारी अभिनेत्रीचे जवाबही नोंदवले गेले.
कथित ठग सुकेश चंद्रशेखर आणि त्याची अभिनेत्री पत्नी लीना मारिया पॉल यांच्याविरोधात नोंदवलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणाशी संबंधित आहे. फर्नांडिस याआधी ऑगस्टमध्ये एजन्सीसमोर हजर झाली होती आणि तिचे जवाब नोंदवले होते. अभिनेत्री नोरा फतेही या आठवड्यात ईडीसमोर हजर झाली आणि या प्रकरणात तिचा जवाब नोंदवला होता.
चंद्रशेखर और पॉल को दिल्ली पुलिस ने फोर्टिस हेल्थेकेयर के पूर्व प्रवर्तक शिवेंद्र मोहन सिंह की पत्नी अदिति सिंह सहित कुछ लोगों से ठगी के आरोप में गिरफ्तार किया था और वे स्थानीय जेल में बंद थे. इसके बाद हाल में उन्हें ईडी ने गिरफ्तार किया.
चंद्रशेखर आणि पॉल यांना दिल्ली पोलिसांनी फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिवेंद्र मोहन सिंग यांच्या पत्नी आदिती सिंगसह काही लोकांना फसवल्याप्रकरणी अटक केली होती आणि त्यांना स्थानिक कारागृहात ठेवण्यात आले होते. यानंतर त्याला अलीकडेच ईडीने अटक केली.
हेही वाचा - ' एक हिंदू म्हणून मला लाज वाटते', बजरंग दलाच्या कृत्यानंतर स्वरा भास्करची प्रतिक्रिया