मुंबई - सध्या प्रचंड व्यस्त असणारी जॅकलिन फर्नांडीझ एका चित्रपटाच्या सेटवरून दुसऱ्या चित्रपटाच्या सेटवर धावत पळत असते. खरेतर हे वर्ष तिच्यासाठी अत्यंत व्यस्त असून त्याबद्दल ती समाधानी आहे. जॅकलिन नेहमीच आपल्या समाज माध्यमांच्या हॅण्डल्सवरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. हल्लीच ती अक्षय कुमार, क्रिती सॅनन, अर्शद वारसी, रितेश देशमुख आणि बॉबी देओल अशी तगडी पात्रयोजना असलेल्या ‘बच्चन पांडे’ च्या शूटसाठी राजस्थानमधील जैसलमेरला गेली होती.
हल्ली चित्रीकरणांमध्ये सुसूत्रता आली असून पूर्वीप्रमाणे शुटिंग्समध्ये वेळ दवडला जात नाही. याच व्यावसायिकतेमुळे चित्रपट वेळेत पूर्ण होतात. त्याच अनुषंगाने जॅकलिन फेर्नांडीझचे शूट वेळापत्रक ठरविले होते. तिचे चित्रपटातील काम संपले देखील आहे. तिला तिच्या पर्सनल टीमचा अभिमान आहे व त्यामुळेच शूटिंगच्या शेवटच्या दिवशी जॅकलिनने आपल्या ‘सर्वोत्कृष्ट’ टीमसोबत सेल्फी काढला व समाज माध्यमांवर तो वाळवंटातील सेल्फी म्हणून ट्रेंड झाला.