मुंबई - अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे हे वर्ष खूप व्यस्ततेत जाणार आहे. ती यावर्षी तब्बल चार चित्रपट करत आहे. ‘किक २’, ‘सर्कस’, ‘भूत पोलीस’ आणि ‘बच्चन पांडे’ या चित्रपटांतून ती दिसेल. सध्या ‘भूत पोलीस’चे शूट सुरु असून पुढील आठवड्यात जॅकलिन ‘बच्चन पांडे’ ला भेटायला जैसलमेरला रवाना होणार आहे.
हा चित्रपट साजिद नाडियाडवाला प्रॉडक्शन्स निर्मित असून त्यात अक्षय कुमार, अर्शद वारसी आणि कृती सॅनन यांच्यासह जॅकलिन फर्नांडिस प्रमुख भूमिकांत आहे. हे सर्व मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जैसलमेरमध्ये डेरा टाकून असणार आहे. त्यानंतर बच्चन पांडेचे शूटिंग पुन्हा मुंबईत सुरू होईल.
‘बच्चन पांडे’ ला भेटायला जॅकलिन निघाली जैसलमेरला! - ‘बच्चन पांडे’मध्ये जॅकलिन फर्नांडिस
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ‘किक २’, ‘सर्कस’, ‘भूत पोलीस’ आणि ‘बच्चन पांडे’ या चित्रपटांतून काम करीत आहे. अत्यंत व्यग्र टाईम शेड्यूल असलेली जॅकलिन पुढील आठवड्यात ती फिल्म ‘बच्चन पांडे’च्या टीममध्ये सामील होईल. बच्चन पांडेचे शुटिंग सध्या जैसलमेरमध्ये सुरू आहे.
जॅकलिन फर्नांडिस