मुंबई- अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस लवकरच अक्षय कुमार, कृती सेनॉन आणि अरशद वारसी यांच्यासह 'बच्चन पांडे' या अॅक्शन कॉमेडी फिल्ममध्ये काम करणार आहे. जॅकलिन म्हणाली, "मी जानेवारीत टीमबरोबर शुटिंग सुरू करेन अशी आशा करते. सध्या मी माझ्या व्यक्तीरेखेविषयी खुलेपणाने बोलू शकत नाही, परंतु मी हे सांगू शकते की हा माझ्यासाठी पूर्णपणे नवीन अवतार आहे."
हेही वाचा-कृती खरबंदाने '14 फेरे'च्या शूटिंगला सुरुवात करण्यापूर्वी केली कोरोना चाचणी
जॅकलिन पुढे म्हणाली, "जेव्हा मी 'हाऊसफुल' (२०१०)मधील 'धन्नो' गाण्यात निर्माता साजिद नादियाडवालाबरोबर काम केले तेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये एकदम नवीन होते. आमचे बॉण्डिंग आणि मैत्री परत आली आहे. मला अक्षय कुमारसोबत पुन्हा काम करण्याची आता प्रतीक्षा आहे. आम्ही एकत्र खूप मजा करतो. मला खात्री आहे की आम्ही पुन्हा एकत्र धमाल करू."
हेही वाचा-ड्रग प्रकरणात पुन्हा ट्रोल झाला भारती सिंहचा नवरा हर्ष लिंबाचिया
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून जैसलमेरमध्ये फरहाद सामजी दिग्दर्शित ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.