मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिज तिच्या पुढच्या चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. जॅकलिनने इंस्टाग्राम स्टोरीजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती योगाभ्यास करताना दिसली आहे, तर तिचे मित्र कपडे पॅक करताना दिसत आहेत.
जॅकलिनने सुरू केली नव्या चित्रपटाची तयारी - Salman Khan in 'Kick 2'
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिजने इंस्टाग्राम स्टोरीजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती योगाभ्यास करताना दिसली आहे, तर तिचे मित्र कपडे पॅक करताना दिसत आहेत. ही सर्व तयारी आगामी चित्रपटासाठीची आहे.

जॅकलिन फर्नांडिज
तिने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "येणारे महिने माझे घराबाहेर असतील आणि येत्या काही महिन्यांसाठी पॅकिंगची तयारी चालू आहे."
अभिनेत्री जॅकलिन आगामी 'किक 2' या चित्रपटात सलमान खानसमवेत आणि सैफ अली खानसोबत 'भूत पोलिस' चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती अर्जुन कपूरसोबतही ‘सर्कस’ चित्रपटात दिसणार आहे.