मुंबई - या सुट्टीच्या काळात अनेक बॉलिवूड तारे सितारे स्वित्झर्लंडमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. यावेळी जॅकलिन फर्नांडिसने वरुण धवन आणि नताशा दलालची तिथे जाऊन भेट घेतली. स्वित्झर्लंडच्या गस्टाडमध्ये जॅकलिनने अभिनेता वरुण आणि नताशासोबत लंच करताना दिसली.
जॅकलिनने वरुण आणि नताशासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने २०२० चा लंच अद्भूत लोकांसोबत केल्याचा उल्लेख केला आहे.
या पोस्टवर वरुणने कॉमेंटमध्ये मस्करी करीत जॅकलिन 'जॅकऑनलाईन' असल्याचे म्हटलंय.
याशिवाय वरुणने जॅकलिनने बर्फात खेळण्याचाही अनुभव घेतला. याचाही व्हिडिओ जॅकलिनने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
यापूर्वी वरुण धवन आणि नताशाने विराट कोहली आणि अनुष्का शर्माची स्वित्झर्लंडमध्ये घेतली होती. त्यानंतर करिश्मा आणि करिना सिस्टर्सही त्यांना भेटल्या होत्या. वरुण धवन सध्या 'स्ट्रीट डान्सर' आणि 'कुली नं १' या दोन चित्रपटात काम करीत आह. त्याच्या 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी'ची सध्या जोरात चर्चा आहे.