महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सिद्धार्थ-परिणीतीची 'जबरिया जोडी', ट्रेलर प्रदर्शित - siddharth malhotra

'जबरिया जोडी' हा चित्रपट बिहारच्या पकडवा विवाह पद्धतीवर आधारित असणार आहे. हुंड्याच्या प्रथेला थांबवण्यासाठी सिद्धार्थ नवरदेवांच्या डोक्यावर बंदुक ताणून त्यांना विवाह करण्यास भाग पाडतो.

सिद्धार्थ-परिणीतीची 'जबरिया जोडी'

By

Published : Jul 1, 2019, 6:16 PM IST

मुंबई- 'हसी तो फसी' चित्रपटातील आपल्या जबरदस्त केमिस्ट्रीनंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्राची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. जबरिया जोडी असं या चित्रपटाचं शीर्षक असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे.

हा चित्रपट बिहारच्या पकडवा विवाह पद्धतीवर आधारित असणार आहे. हुंड्याच्या प्रथेला थांबवण्यासाठी सिद्धार्थ नवरदेवांच्या डोक्यावर बंदुक ताणून त्यांना विवाह करण्यास भाग पाडतो. बिहारमध्ये तीन प्रकारच्या जोड्या असतात. एक अरेंज मॅरेज, नशीबवाल्यांचं लव्ह मॅरेज तर हुंड्यावाल्यांची जबरिया जोडी, असे शब्द ट्रेलरच्या सुरूवातीला कानावर पडतात.

सिद्धार्थ-परिणीतीची 'जबरिया जोडी'

दरम्यान ट्रेलरममध्ये परिणीती आणि सिद्धार्थच्या प्रेमाची झलकही पाहायला मिळते. मात्र, काही वेळातच मला राजकारणात प्रवेश करायचा असल्यानं या सर्व गोष्टींमध्ये पडायचं नसल्याचं म्हणत सिद्धार्थ परिणीतीसोबतचं नातं तोडतो. यानंतर सिद्धार्थचं अपहरण करून त्याला लग्नासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न परिणीती करते. या दरम्यान घडणारे अनेक विनोद ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात. प्रशांत सिंग यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट येत्या २ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details