मुंबई - अक्षय कुमारचा 'मिशन मंगल', प्रभासचा 'साहो' आणि जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' हे तिन्ही चित्रपट १५ ऑगस्टला रिलीज होणार होते. या तीन मोठ्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाल्यास याचा फटका तिन्ही सिनेमाच्या कमाईवर होणार हे निश्चित होते. हा विचार करीत अखेर प्रभासच्या साहो चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता 'साहो' ३० ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल.
'तीन तिघाडा, काम बिघाडा'ची स्थिती टाळण्यासाठी प्रभासच्या 'साहो'चे रिलीज ढकलले पुढे - Batla House
१५ ऑगस्टला एकाच दिवशी तीन बिग बजेट चित्रपट रिलीज होणार होते. तीन चित्रपट एकाच आठवड्यात पाहणे सामान्यांना परवडणारे नाही. याचा परिणाम चित्रपटाच्या व्यवसायावरही होऊ शकतो. हा विचार करीत प्रभासच्या 'साहो' चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलंय.
१५ ऑगस्टला एकाच दिवशी तीन बिग बजेट चित्रपट रिलीज होणार आहेत. तीन चित्रपट एकाच आठवड्यात पाहणे सामान्यांना परवडणारे नाही. याचा परिणाम चित्रपटाच्या व्यवसायावरही होऊ शकतो, असे मत ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी एक व्हिडिओ शेअर करीत व्यक्त केले होते. याचा विचार तिन्ही निर्मात्यांना अखेर करावा लागल्याचे दिसत आहे. म्हणून साहोच्या निर्मात्याने हा विचार लक्षात घेत रिलीज पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय तरण आदर्श यांनी ट्विटरवर कळवला आहे.
आता अक्षय कुमारचा 'मिशन मंगल', आणि जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' हे दोन चित्रपट १५ ऑगस्टला रिलीज होणार आहेत. यांची बॉक्स ऑफिसवर होणारी टक्कर दोन्ही निर्मात्यांना घाट्यात आणणारी ठरु शकते. अजूनही त्यांना रिलीजची तारीख बदलण्याची संधी आहे.