मुंबई- अल्पावधीतच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडणारा विकी कौशल लवकरच एका हॉरर चित्रपटामध्ये भूमिका साकारणार आहे. 'भूत' असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात विकी कौशल आणि भूमी पेडणेकर झळकणार असून या कलाकारांनी सिनेमाच्या पहिल्या भागाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण केलं आहे.
हेही वाचा - बॉलिवूडच्या या कलाकारांनी दिल्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
या सिनेमाच्या निमित्ताने विकी पहिल्यांदाच हॉरर सिनेमात भूमिका साकारताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. विकीचा हा वेगळा अवतार पाहण्यासाठी त्याचे चाहतेही प्रचंड उत्सुक आहेत. एका जहाजेची हॉरर कथा प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळणार आहे. भूत - द हॉन्टेड शीप असं या चित्रपटाचं शीर्षक आहे.
हा चित्रपट शशांक खेतान आणि करण जोहर मिळून तयार करणार आहेत. तर, भानू प्रताप सिंग हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा सिनेमा येत्या नोव्हेंबर महिन्यात १५ तारखेला प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - साहोला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद, श्रद्धाने मानले आभार