मुंबई- आयुष्मान खुराणा आणि यामी गौतम ही जोडी 'विकी डोनर' चित्रपटानंतर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'बाला' असं त्यांच्या आगामी चित्रपटाचं शीर्षक आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. यानंतर आता या चित्रपटाचं चित्रीकरणही पूर्ण झालं आहे.
आयुष्मान-यामीच्या 'बाला'चं चित्रीकरण पूर्ण, शेअर केले फोटो - filming complete
बाला चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण होताच आयुष्मान आणि यामीनं आपल्या सोशल मीडियावरून केक कापून सेलिब्रेशन करतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण होताच आयुष्मान आणि यामीनं आपल्या सोशल मीडियावरून केक कापून सेलिब्रेशन करतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. आयुष्यमानचा हा आगामी चित्रपट युवावस्थेत टक्कल पडण्याच्या समस्येवर आधारित आहे. या चित्रपटात आयुष्मानने अशाच एका व्यक्तीची भूमिका साकारली आहे.
दरम्यान या सिनेमात यामी आणि आयुष्मानशिवाय भूमी पेडणेकरही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. याआधी 'दम लगा के हैशा' आणि 'शुभ मंगल सावधान'मध्ये स्क्रीन शेअर केलेली भूमी आणि आयुष्मानची जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने तिसऱ्यांदा एकत्र झळकणार आहे. अमर कौशिकचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांनी केली आहे. येत्या सप्टेंबरमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे.