मुंबई- यावर्षीच्या सर्वाधिक चर्चेत असणाऱया चित्रपटांच्या यादीत अमिताभ बच्चन यांच्या 'गुलाबो सिताबो' चित्रपटाचा समावेश आहे. यात त्यांच्यासोबत आयुष्मान खुराणादेखील झळकणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून अमिताभ यांनी चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत.
PHOTO: 'गुलाबो सिताबो'चं चित्रीकरण पूर्ण होताच अमिताभनं सुरू केली 'केबीसी'ची तयारी - कोन बनेगा करोडपती
'गुलाबो सिताबो'चं चित्रीकरण पूर्ण, न थांबता उत्तम पद्धतीने योजना आखून केलेलं काम. आता पुढच्या कामाला सुरूवात...कोन बनेगा करोडपती, असं अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
'गुलाबो सिताबो'चं चित्रीकरण पूर्ण, न थांबता उत्तम पद्धतीने योजना आखून केलेलं काम. आता पुढच्या कामाला सुरूवात...कोन बनेगा करोडपती, असं अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. एका ट्विटमध्ये त्यांनी आपला गुलाबो सिताबो आणि केबीसीच्या सेटवरील मेकअप करतानाचा फोटो शेअर केला आहे.
तर दुसऱ्या ट्विटमध्ये अमिताभ यांनी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर सेटवर आनंद साजरा करतानाचे काही फोटो त्यांनी शेअर केले आहेत. दरम्यान सुजीत सरकार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पुढच्या वर्षी २४ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून याशिवाय अमिताभ 'चेहरे' चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.