मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने काही महिन्यांपूर्वीच निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली आहे. प्रियांकानंतर तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्रादेखील विवाहबंधनात अडकणार होता. तो इशिता कुमार या तरूणीसोबत लग्नगाठ बांधणार होता. मात्र, काही कारणांमुळे हे लग्न रद्द झाले.
ईशिताने सिद्धार्थ चोप्रासाठी शेअर केली ही भावनिक पोस्ट ! - priyanka chopra
सिद्धार्थची आई मधू चोप्रा यांनी लग्नाबद्दल घाई करणे योग्य नाही, असे म्हणत स्वतः हे लग्न होणार नसल्याचा खुलासा केला होता. मात्र, या धक्क्यातून ईशिता अद्यापही बाहेर आली नसल्याचे तिने नुकतंच शेअर केलेल्या एका पोस्टवरून दिसत आहे.
सिद्धार्थची आई मधू चोप्रा यांनी लग्नाबद्दल घाई करणे योग्य नाही, असे म्हणत स्वतः याबद्दल खुलासा केला होता. मात्र, या धक्क्यातून ईशिता अद्यापही बाहेर आली नसल्याचे तिने नुकतंच शेअर केलेल्या एका पोस्टवरून दिसत आहे. ‘माणसं तुम्हाला आता सुखद अनुभव देत नाहीत. तर थेट हाय ब्लड प्रेशर देतात’, असे तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.
या पोस्टमध्ये तिने सिद्धार्थच्या नावाचा उल्लेख केला नसला तरीही अनेकांनी या पोस्टरवर कमेंट करत हे सिद्धार्थसाठी असल्याचे म्हटले आहे. सिद्धार्थसोबतचे लग्न मोडल्यानंतर ईशिता पुन्हा एकदा आपल्या कामावर परतली असून ती सध्या लंडनला आहे.