मुंबई - १९७१ च्या युद्धावर आधारित पिप्पा या चित्रपटाच्या निर्मात्यांनी कलाकारांची घोषणा गेल्या वर्षी केली होती. या चित्रपटात इशान खट्टर, मृणाल ठाकूर, सोनी राजदान आणि प्रियांशु पेन्युली यांचा समावेश आहे. आता या तचित्रपटाच्या प्रत्यक्ष शुटिंगला सुरुवात झाली आहे.
चित्रपट समीक्षक आणि व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर चित्रपटाच्या शुटिंगविषयीचे अपडेट शेअर केले. "पिप्पा या १९७१ च्या युध्द चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात झाली. इशान खट्टर, मृणाल ठाकूर, सोनी राजदान आणि प्रियांशु पेन्युली या युद्ध चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे अमृतसरमध्ये शुटिंग सुरू झाले, असे त्यांनी लिहिलंय.