मुंबई- १९७१ च्या युद्धावर आधारित पिप्पा या चित्रपटाच्या निर्मात्यांनी कलाकारांची घोषणा केली आहे. या चित्रपटात इशान खट्टर, मृणाल ठाकूर, सोनी राजदान आणि प्रियांशु पेन्युली यांचा समावेश आहे.
इशान, मृणाल, प्रियांशु 'पिप्पा' या युद्धपटात साकारणार भूमिका - Mrinal Thakur latest news
निर्माता रॉनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांनी आपल्या आगामी पिप्पा या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात इशान खट्टर, मृणाल ठाकूर, सोनी राजदान आणि प्रियांशु पेन्युली मुख्य भूमिका साकारणार आहेत.
इशान, मृणाल, प्रियांशु पिप्पा
चित्रपट समीक्षक आणि व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर चित्रपटाच्या कलाकारांविषयीचे अपडेट शेअर केले. "पिप्पा या १९७१ च्या युध्द चित्रपटाची स्टार कास्ट निश्चित झाली आहे. इशान खट्टर, मृणाल ठाकूर, सोनी राजदान आणि प्रियांशु पेन्युली या युद्ध चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत.''
राजा कृष्णा मेनन दिग्दर्शित हा चित्रपट 'द बर्निंग चाफीज' या पुस्तकावर आधारित असून रॉनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांच्याकडे या पुस्तकाचे अधिकार आहेत.