मुंबई- बॉलिवूडचे नवदांपत्य कॅटरिना कैफ आणि विकी कौशल लग्नानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. या जोडप्याने शनिवारी हळदी समारंभाचे सुंदर फोटो शेअर केले. कॅटरिना आणि विकी यांच्यातील प्रेम या फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे. चाहते आणि बॉलिवूड स्टार्स या फोटोंवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. आता विकी कौशलची मेहुणी इसाबेल कैफ हिनेही हळदी समारंभाचे खास फोटो शेअर करून आनंद वाढवला आहे.
कॅटरिना आणि विकीने शनिवारी सोशल मीडियावर त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हळदी समारंभाचे अनेक फोटो टाकले, ज्यावर लाखो चाहत्यांनी आतापर्यंत लाईक बटण दाबले आहे. चाहत्यांव्यतिरिक्त अनेक बॉलिवूड स्टार्सनीही या जोडप्याच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.