मुंबई- बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची मुलगी इरा खान नेहमीच तिच्या लव्ह लाईफबद्दल बोलत असते. तिचा प्रियकर नपुर शिखरेसोबतच्या ख्रिसमसच्या सुट्टीचे फोटो शेअर करण्यापासून ते त्याच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यापर्यंत, इरा तिच्या फॉलोअर्सना तिच्या वैयक्तिक आयुष्याची झलक दाखवत असते. तिच्या ताज्या सोशल मीडिया पोस्टमध्ये, इरा खान साडी नेसलेली दिसत आहे. ही साडी तिला नुपूरच्या आईने भेट दिलेली आहे.
बऱ्याच काळापासून इराने रविवार साडी नेसण्याचा दिनक्रम पाळायला सुरुवात केली आहे. कालच्या रविवारीही ती साडीत दिसली. तिने नेसलेली ही ऑफ व्हाईट साडी प्रतीमा शिखरे यांनी तिला भेट म्हणून दिली होती.
रविवारी इराने आपल्या इन्स्टाग्रामवर फोटोंची एक झलक शेअर केली. या पोस्टमध्ये ती नुपूर आणि त्याच्या आईसोबत पोज देताना दिसत आहे. फोटो शेअर करताना तिने लिहिले, "बॉम्बेची खादी कॉटन साडी. शुभ संडे! साडीसाठी प्रीतम शिखरे यांचे आभार. कृपया हँडबॅग्ज चुकवू नका!"
गेल्या वर्षापासून इरा खानने अस्तु फाऊंडेशनची स्थापना करुन सामाजिक काम करण्यास सुरुवात केली आहे. मानसिक आरोग्य सहाय्य करण्यासाठी ती कार्य करीत आहे. मानसिक आरोग्याबाबत जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न करत इराने नैराश्याबाबतचा तिचा अनुभव यापूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता. इरा तिच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल बोलली आहे आणि ती आपल्या संस्थेमार्फत या कठीण काळात गरजूंना मदत करीत आहे.
हेही वाचा -ब्रेकअपनंतर पुन्हा उभारी घेण्याच्या तयारीत रोहमन शॉल