महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

लॉक डाऊन : IPRS करणार म्युझिक इंडस्ट्रीतील गरीब कर्मचारी वर्गाची मदत - Shabana Azami latest news

देशभरात लॉक डाऊन सुरू आहे. अशावेळी आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या कर्मचाऱ्यांचा मदतीला IPRS आली आहे. ही माहिती इंडियन परफॉर्मिंग राइट्स सोसाइटी (आईपीआरएस)चे चेयरमन जावेद अख्तर यांनी एका संदेशातून दिली आहे.

Javed Akhtar
जावेद अख्तर

By

Published : Mar 27, 2020, 4:22 PM IST

मुंबईः देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या कर्मचाऱ्यांचा भल्यासाठी फंड उभा करण्याचा निर्धार गीतकार आणि इंडियन परफॉर्मिंग राइट्स सोसाइटी (आईपीआरएस) चे चेयरमन जावेद अख्तर यांनी केला आहे.शबाना आझमी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करीत ही माहिती दिलीय. कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी सरकारची मदत करण्याचे आवाहन या व्हिडिओत जावेद अख्तर यांनी केले आहे.

जावेद अख्तर यांनी व्हिडिओत म्हटलंय, 'मी इंडियन परफॉर्मिंग राइट्स सोसाइटीचा चेयरमन आहे. ही सरकार मान्यता प्राप्त संस्था आहे. आमच्याकडे संगीतकार,कंपोजर्स आणि गीतकार यांची रॉयल्टी जमा करण्याचा अधिकार आहे आणि आम्ही तसे करतो. आता अशी वेळ आली आहे की, अनेक सदस्य भाग्यशाली नाहीत.''

त्यांनी पुढे म्हटलंय, ''तेव्हा ज्यांच्याकडे सुख सुविधा आहेत अशांची जबाबदारी बनते की आमच्या सोसायटीत जे आर्थिकदृष्ट्या कमजोर लोक आहेत अशांची मदत केली पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात आपला प्रत्येक सदस्य जगू शकेलयासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय.''

यापूर्वी कोरोना व्हायरस निधीसाठी पवन कल्याण याने २ कोटी, सुपरस्टार चिरंजीवी याने १ कोटी आणि सुपरस्टार महेशबाबू याने १ कोटींचा निधी दिला आहे. अनेक बॉलिवूड सेलेब्सनी 'आय स्टँड विद ह्यूमॅनिटी' या नावाने पुढाकार घेत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गरीबांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details