मुंबई- बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मेगा लिलावात सहभागी होणार नाही. SRK चा मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना खान शुक्रवारी प्री-ऑक्शन टीम ब्रीफिंगमध्ये त्याचे प्रतिनिधी म्हणून हजर आहेत. या कार्यक्रमातील बहिण भावाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीगच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर प्री-लिलाव कार्यक्रमातील काही फोटो शेअर करण्यात आले. एका फोटोत आर्यन त्याच्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीसोबत संवाद साधताना दिसत आहे तर सुहाना त्याच्या शेजारी बसलेली दिसत आहे. आर्यन दुसऱ्यांदा आयपीएल लिलावासाठी परतला असून सुहानाने प्रथमच आयपीएल 2022 मेगा लिलाव कार्यक्रमात भाग घेतला आहे. यात एकूण 590 खेळाडू - 370 भारतीय आणि 220 परदेशी खेळाडू लिलावाच्या यादीत आहेत. हा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला बेंगळुरूमध्ये होणार आहे.