महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

तेव्हा मी सातव्या स्वर्गात होतो - ब्रिजेंद्र काला

अभिनेता ब्रिजेंद्र काला शूजित सरकार यांच्या आगामी ‘गुलाबो सीताबो’ या चित्रपटात वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. ईटीव्ही भारत सिताराला दिलेल्या एका खास मुलाखतीत या अभिनेत्याने दोन नामांकित तार्‍यांसह चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगितला.

Brijendra Kala
अभिनेता ब्रिजेंद्र काला

By

Published : Jun 3, 2020, 8:57 PM IST

मुंबई - मथुरा येथे जन्मलेले अभिनेता ब्रिजेंद्र काला गेल्या 17 वर्षांपासून थिएटरशी संबंधित आहेत. एकापेक्षा एक चित्रपटात भूमिका केलेल्या काला यांनी एकता कपूरच्या 'कहानी घर घर की'साठी संवादही लिहिले आहेत. शूजित सरकार यांच्या आगामी 'गुलाबो सीताबो'मध्ये वकिलाची भूमिका साकारताना काला दिसणार आहेत. ईटीव्ही भारत सिताराशी खास संवाद साधताना ब्रिजेंद्र काला यांनी ए-लिस्टर्ससमवेत या चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगितला. या मुलाखतीचा भाग पुढीलप्रमाणे आहे...

'गुलाबो सीताबो' चित्रपट ओटीटीवर रिलीज होतोय, त्याबद्दल..

ब्रिजेंद्र काला : लॉकडाऊनच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. आपण जर थिएटर्स उघडण्याची प्रतीक्षा करीत राहिलो तर त्याला खूप वेळ लागेल. संपूर्ण वर्ष निघून जाईल. बरेच चित्रपट त्याच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रत्येकजण सिनेमा हॉल उघडण्याच्या प्रतीक्षेत आहे. आशा आहे, की सर्व सुरक्षित असतील. तर आता हे एकमेव माध्यम आहे ज्याद्वारे आपण सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवू शकतो.

चित्रपटात आपल्या वकिलाच्या भूमिकेबद्दल ...

ब्रिजेंद्र काला : माझं पात्र खूप रंजक आणि गंमतीशीर आहे. पानसिंग तोमर चित्रपटानंतर मी अशी व्यक्तिरेखा साकारण्यास सक्षम असल्याचे पाहून मला खूप चांगले वाटते. व्यक्तीरेखेविषयी सर्व काही स्क्रिप्टमध्ये सुरुवातीपासूनच लिहिलेले आहे. मला फक्त परफॉर्म करावा लागला. म्हणून मी जूही चतुर्वेदी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखकाचे कौतुक करू इच्छितो.

'गुलाबो सीताबो'मध्ये अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना सोबत काम करत आहे ...

ब्रिजेंद्र काला : मी यापूर्वी आयुष्मान आणि अमिताभजी यांच्याबरोबर काम केले आहे. पूर्वी चांगला अनुभव आला होता. हा पुन्हा एक चांगला अनुभव आहे. आणि खरं सांगायचं तर बच्चनजी सोबत काम करण्याचा अनुभव वेगळा आहे.

दिग्गज अभिनेत्यासह स्क्रीन स्पेस शेअर करण्याचा आपला अनुभव कसा होता?

ब्रिजेंद्र काला : जेव्हा मी सेटवर गेलो तेव्हा पहिल्या दिवशी ४ ते ५ टेकनंतर दिग्दर्शकांनी 'ओके' म्हटले. शूजितने पुढच्या शॉटसाठी तयार राहायला सांगितले. दरम्यान, बच्चनजींनी मला बोलावले आणि म्हणाले, "सर, तुम्ही संवाद ज्या पद्धतीने बोलता हे एक वेगळे तंत्र आहे." मी तेव्हा त्यांचा चेहरा पहात होतो. जेव्हा त्यांनी माझे कौतुक केले तेव्हा मी सातव्या स्वर्गात होतो. नंतर, आम्ही समान टेक्निकमध्ये सीन केला आणि सर्वांना आवडला. माझ्यासाठी ती एक संस्मरणीय घटना आहे.

विक्की डोनर आणि पीकू फेम शूजित सरकार यांच्यासोबत काम करत असताना ...

ब्रिजेंद्र काला : मी शूजित सरकारबरोबर काम करण्याची वाट पाहिली आहे. मी त्यांच्या कंपनी अंतर्गत 'शादी डॉट कॉम' चित्रपटात काम केले. मग मी बर्‍याच वेळा विचार केला की, मला पुन्हा त्याच्याबरोबर काम करण्याची संधी कधी मिळेल? मी काही जाहिरातींमध्येही काम केले आहे. मी विचार केला की कदाचित त्यांच्यासोबतन यापूर्वी तयार केलेल्या चित्रपटामध्ये मला एक स्थान मिळेल. शेवटी, दिवस आला आणि मला एक संधी मिळाली. पहिल्या दिवसापासून, जेव्हा त्यांनी माझ्याबरोबर स्क्रिप्टवर काम करण्यास सुरुवात करीत होते तेव्हापासून मला ते आवडले. शूटच्या पहिल्याच दिवशी मला समजले की शूजित कोणत्या प्रकारचे दिग्दर्शक आहे. चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्याला त्याच्या कम्फर्ट झोनमध्ये कसे आणता येईल हे त्यांना माहित आहे. अमिताभ बच्चन असो वा माझ्यासारख्या अभिनेता असो वा विजयराज असो, विविध कलाकारांसोबत कसे काम करावे हे शूजितला माहित आहे.

आपण कोणत्या ऑडिशनसाठी उपस्थित होता?

ब्रिजेंद्र काला : माझी ऑडिशन घेतली नाही. माझा एक चांगला मित्र योगीभाई, त्याने शूजित सरकरसाठी कलाकारांची निवड केली आणि मला कॉल केला आणि म्हणाले, "कालाभाई, शूजित एक चित्रपट बनवत आहेत. त्यात वकिलाची भूमिका आहे. तुम्हाला ती करायलाच पाहिजे." स्क्रिप्ट ऐकल्यानंतर आणि शूजितबद्दल आणखीन काही माहिती मिळाल्यानंतर मी लगेचच मान्य केले.

लखनौमध्ये झालेल्या शूटिंगबद्दल सांगा ...

ब्रिजेंद्र काला : मी उत्तर भारतातील एका छोट्या गावात वाढलो. लोक अभिनयासाठी मुंबईला जातात, मी थिएटरसाठी लखनौला पळून गेलो होतो. तर, हे जुने ठिकाण आहे, लखनौ हे माझे आवडते ठिकाण आहे. त्यामुळे शूटिंगचा अनुभवही माझ्यासाठी खूप चांगला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details