पणजी - अभिनेता धनुषच्या दिग्दर्शक वेत्रीमारनच्या तमिळ चित्रपट "असुरन" मधील उत्कृष्ट अभिनयासाठी त्याला रविवारी येथे संपलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 52 व्या चित्रपटा महोत्सावाच्या ब्रिक्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे याच वर्षाच्या सुरुवातीला याच चित्रपटासाठी धनुषला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात धनुषने डबल रोल साकारला आहे.
धनुषला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला, तर लारा बोलडोरिनीला 'ऑन व्हील्स' या ब्राझिलियन चित्रपटातील अभिनयासाठी महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (महिला) पुरस्कार देण्यात आला.
सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार दक्षिण आफ्रिकन चित्रपट 'बरकत' आणि रशियन चित्रपट 'द सन अबव्ह मी नेव्हर सेट' या दोन चित्रपटांना मिळाला. 'बरकत'चे दिग्दर्शन एमी झेफ्ता यांनी केले आहे, तर रशियन चित्रपटाचे दिग्दर्शन ल्युबोव बोरिसोवा यांनी केले आहे. या समारंभात चिनी दिग्दर्शक यान हान यांना त्यांच्या 'अ लिटल रेड फ्लॉवर' चित्रपटासाठी विशेष उल्लेख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
इफ्फीच्या संयुक्त विद्यमाने पहिल्यांदाच ब्रिक्स चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रिक्स महोत्सवात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेतील चित्रपट सहभागी झाले होते.
हेही वाचा - अजय देवगण दिग्दर्शित ‘मे डे’ सिनेमाचं शीर्षक बदललं, ठरली ‘रनवे ३४’च्या रिलीजची तारीख