मुंबई - निर्माता राजकुमार हिराणी यांच्या आगामी शाहरुख खानसोबतच्या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नूची निवड करण्यात आली आहे. हिराणी आणि एसआरके यांच्या एकत्र येण्याने हा चित्रपट आधीच चर्चेचा विषय बनला आहे. हा चित्रपट एक इमिग्रेशनवरील सोशल कॉमेडी आहे. पंजाबहून कॅनडाला जाऊन काम करणाऱ्या परप्रांतीयाच्या भूमिकेत सुपरस्टार शाहरुख खान असणार असल्याचे समजते.
या चित्रपटाबद्दलची ताजी चर्चा आहे ती म्हणजे या चित्रपटाच्या नायिकेची. शाहरुख खानसोबत तापसी पन्नू रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. तिचा हा एसआरकेसोबतचा पहिलाच चित्रपट असेल.