महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'आदिपुरुष'मध्ये 'लंकेश'च्या भूमिकेसाठी सैफ अलीत होणार 'हे' रंजक बदल - प्रभासचा आगामी चित्रपट

रामायण या महाकाव्यावर आधारित 'आदिपुरुष' या चित्रपटाचे शुटिंग या महिन्यात सुरू होईल. यात प्रभास रामाची तर सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे. यासाठी मुंबईत भव्य सेट उभा करण्यात येत आहे.

Saif's character Lankesh in Adipurush
'आदिपुरुष'मध्ये सैफ अली खान

By

Published : Jan 5, 2021, 3:58 PM IST

मुंबई - प्रभासचा आगामी चित्रपट 'आदिपुरुष'मध्ये सैफ अली खान लंकेश ही भूमिका साकारत आहे. 'बाहुबली' स्टार प्रभास यामध्ये प्रभू रामाची भूमिका साकारणार आहे. रामायण या महाकाव्यावर आधारित या चित्रपटामध्ये सैफ अली खान खलनायकाची भूमिका करणार आहे.

लंकेशच्या भूमिकेसाठी सैफमध्ये होणार खालील बदल

मिळालेल्या माहितीनुसार यात सैफ अली खानची व्यक्तीरेखा भारदास्त असणार आहे. त्याची उंची ८ ते नऊ फुट असेल (सध्या सैफची उंची ५ फूट ५ इंच आहे.) , दाट मिशा आणि लांब केस यात ठेवण्यात येतील. हा अवतार बनवण्यासाठी मेकअपबरोबरच ग्राफिक्सचाही वापर करण्यात येईल.

आदिपुरुष पोस्टर

प्रभास आणि सैफ अलीचा हा भव्य चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच चर्चेचा विषय ठरला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सैफ अली खानने केलेले एक विधान भरपूर चर्चेचा आणि टीकेचा विषय बनले होते. या चित्रपटात रावणाची मानवी बाजू दाखवण्यात येणार असल्याचे तो म्हणाला होता. त्यानंतर तो खूप ट्रोल झाला होता. अखेरीस त्याने माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

'आदिपुरुष' या चित्रपटाचे शुटिंग १९ जानेवारीला सुरू होईल. मुंबईत यासाठी एक भव्य सेट उभारला जात आहे. दरम्यान प्रभास, सैफ आणि कृती सेनॉन या आघाडीच्या कलाकारांनी आपल्या व्यक्तिरेखेसाठी कार्यशाळा सुरू केली आहेत.

हेही वाचा -रिचा चढ्ढाचा "मॅडम चीफ मिनीस्टर" चित्रपट २२ जानेवारीला होणार थिएटरमध्ये रिलीज

ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details