मुंबई - 'नो गन्स ओन्ली गट्स' अशी दमदार टॅगलाईन असलेला 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'चा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटात अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. १६ एप्रिललाच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता.
'या' दिवशी प्रदर्शित होणार अर्जूनच्या 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'चा ट्रेलर
अॅक्शन आणि क्राईम थ्रिलर असलेल्या या चित्रपटात अर्जुन कपुर महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केले आहे.
यापाठोपाठ आता चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या २ तारखेला म्हणजेच गुरूवारी चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारताला हवा असलेला सर्वात क्रुर गुन्हेगार ज्याचे नाव 'इंडियाज ओसामा' असे आहे, त्याला पकडण्यासाठी अर्जुन आणि टीमची चाललेली धडपड या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
अॅक्शन आणि क्राईम थ्रिलर असलेल्या या चित्रपटात अर्जुन कपुर महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केले आहे. तर फॉक्स स्टार स्टुडिओज अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. २४ मे २०१९ ला हा चित्रपट चित्रपटगृहात झळकणार आहे.