महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'ला शोध प्रेक्षकांचा, दुसऱ्या दिवशी केली एवढी कमाई - first day

या चित्रपटाची पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीची कमाई समोर आली असून पहिल्या दिवशी या चित्रपटाने केवळ २.१० कोटींची कमाई केली आहे.

'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'ला शोध प्रेक्षकांचा

By

Published : May 26, 2019, 3:14 PM IST

मुंबई- अर्जून कपूरची मुख्य भूमिका असलेला 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या निमित्ताने अर्जून एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, अर्जूनचा हा वेगळेपणा प्रेक्षकांना फारसा भावलेला दिसत नाही.

या चित्रपटाची पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीची कमाई समोर आली असून पहिल्या दिवशी या चित्रपटाने केवळ २.१० कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी कमाईच्या आकड्यात काही प्रमाणात वाढ झाली असून ३.३ कोटींची कमाई चित्रपटाने केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केले आहे. तर फॉक्स स्टार स्टुडिओज अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

भारतावर होणाऱ्या हल्ल्यात अनेक निष्पापांचे जाणारे जीव थांबवण्यासाठी ५ लोकांच्या टीमने उचलेलं पाऊल आणि सर्वात क्रुर गुन्हेगार ओसामाला पकडण्यासाठी कोणत्याही हत्यारांविना चाललेली या टीमची धडपड, या चित्रपटातून पाहायला मिळते. आता चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणखी किती गल्ला जमवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details