सलमान खानचा बाहुप्रतीक्षित दबंग ३ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. चलबुल पांडेची नेहमीची करामत याही चित्रपटात प्रेक्षकांची भरपूर मनोरंजन करेल. रज्जोच्या भूमिकेतील सोनाक्षी सिन्हा या चित्रपटटात रंग भरणार हे तिच्या अदांवरुन स्पष्ट दिसत आहे.
चुलबूल रॉबिनहूड पांडे 'दबंग ३' मधून परतला, पाहा आकर्षक ट्रेलर - salman Khan latest news
मोठ्या पडद्यावर पुन्हा धुमारुळ घालण्यासाठी सलमानचा दबंग ३ चित्रपट सज्ज झालाय. या चित्रपटाचा आकर्षक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
दबंग ३
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी या दबंग ३ चा ट्रेलर रिलीज झाल्याची बातमी ट्विट करुन दिली आहे. सलमान खान फिल्मने सॅफ्रन ब्रॉडकास्ट एँड मीडिया लिमिटेड यांची निर्मिती असलेला हा चित्रपट अरबाज खान प्रॉडक्शनची प्रस्तुती आहे. प्रभू देवा यांचा हा आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या पंक्तीत बसू शकेल असा हा बॉलिवूड चित्रपट आहे. येत्या २० डिसेंबरला दबंग ३ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.